Air India Plane Crash – धुरच धूर, काहीच दिसेना… ब्लँकेट गुंडाळत अकोल्याच्या ऐश्वर्याने वाचवला स्वतःचा जीव

अहमदाबादमध्ये विमानतळाच्या शेजारी असलेल्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळलं आणि अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. विमान कोसळलं तिथे अकोल्याची तरुणी ऐश्वर्या तोष्णीवालाही होती. यावेळी तिला मृत्यू समोर दिसत होता. मात्र, धैर्य दाखवत तिने संकटावर मात केली.

अकोल्याची ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत आहे. आजोबांचा वाढदिवस साजरा करून ती नुकतीच अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. ज्या वेळेला विमान होस्टेलला धडकलं तेव्हा ऐश्वर्या झोपली होती. विमान आदळून मोठा स्फोट झाला आणि ती दचकून बाहेर आली. बघते तर सर्वत्र धुरचं धुर होता. मृत्यू समोर दिसत होता. परंतु ती परिस्थिती धैर्याने हाताळली आणि स्वत:ला चादरीत गुंडाळून घेतलं आणि पाचव्या मजल्यावरुन खाली उतरली. या धावपळीत तिच्या हाताला, पायाला आणि चेहऱ्याला भाजलं. ऐश्वर्याच्या कुटुंबियांना या भीषण अपघाताचं कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र, जेव्हा त्यांचं ऐश्वर्याशी बोलणं झालं, तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला.

नियतीने डाव साधला! पत्नीची अखेरची इच्छा पूर्ण करायला आलेल्या पतीचाही विमान दुर्घटनेत शेवट