हिंदुस्थानातून 3.2 अब्ज डॉलर्सचे आयफोन निर्यात

हिंदुस्थानात आयपह्न बनवणाऱया फॉक्सकाॅन कंपनीने मार्च ते मे या दरम्यान 3.2 अब्ज डॉलर्सच्या किंमतीचे आयफोन अमेरिकेला निर्यात केले आहेत. सीमा शुल्काच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 2025 मध्ये हिंदुस्थानात बनवलेले 97 टक्के फोन हे अमेरिकेला पाठवले आहेत. 2024 मध्ये ही निर्यात सरासरी 50.3 टक्के होती. मार्चमध्ये पाठवलेल्या आयफोनचे मूल्य 1.3 अब्ज डॉलर होते. तर मे 2025 मध्ये अमेरिकेला पाठवलेल्या आयफोनमचे मूल्य जवळपास 1 अब्ज डॉलर होते. अॅपल कंपनीने निर्यातीवर भाष्य करण्यास नकार दिला आहे.