
ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांचे आज निधन झाले ते 84 वर्षाचे होते. निरपेक्ष, लढाऊ, स्वयंसेवक पत्रकार आणि मार्गदर्शक म्हणून त्यांची समाजात ओळख होती. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
आचार्य अत्र्यांच्या ‘मराठा’ मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. त्यानंतर इंग्रजी भाषेतील ’मिड डे’ मध्ये राजकीय संपादक या पदावर त्यांनी काम केले. तिथे त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. अरविंद कुलकर्णी यांनी काही वर्षे साप्ताहिक विवेक, मासिक धर्मभास्करचे संपादनही केले होते. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेचे मुंबईतील ब्युरोप्रमुख म्हणूनही त्यांनी लक्षणीय काम केले तसेच अनेक तरुणांना राष्ट्रीय विचाराच्या पत्रकारितेचे धडे त्यांनी दिले. जवळपास दशकभर पु. भा. भावे स्मृतिसमितीचे कार्यवाह म्हणून काम केले.