
रेल्वेने मातृत्व आणि पितृत्व रजेत मोठे बदल केले आहेत. सामान्य आईप्रमाणे सरोगसीने आई बनलेल्या महिलेलाही (कमिशनिंग मदर) मातृत्व रजा मिळणार आहे. या काळात तिला भरपगारी सुट्टी मिळेल. जर सरोगेट किंवा कमिशनिंग मदर दोघी रेल्वे कर्मचारी असतील, तर त्यांना 180 दिवसांची मातृत्व रजा मिळेल. नव्या नियमानुसार, सरोगसीने जन्मलेल्या बाळाचा पिता (कमिशनिंग फादर) रेल्वे कर्मचारी असेल तर त्यालाही सहा महिन्यांच्या आता 15 दिवसांची सुट्टी दिली जाऊ शकते. पुरुष रेल्वे कर्मचाऱ्याने एक वर्षाहून कमी वयाच्या बाळाला दत्तक घेतले तर त्याला 15 दिवसांची पितृत्व रजा मिळू शकते. बाळाला दत्तक घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आता ही रजा घेणे गरजेचे आहे. रेल्वे कर्मचाऱ्याने एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळाला दत्तक घेतले तर 180 दिवसांची सुट्टी मिळू शकते.