
केके मेननची प्रमुख भूमिका असलेली ऍक्शन-थ्रिलर वेब सीरिज ‘स्पेशल ऑप्स-2’ येत्या 11 जुलै 2025 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 2020 मध्ये आलेल्या या सीरिजचा हा सीक्वेल आहे. या वेब सीरिजमध्ये पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत केके मेनन आहे. या सीरीजमध्ये करण ठक्कर, विनय पाठक, मुजम्मिल इब्राहिम, सैयामी खेर, मेहर विज, ताहिर राज भसीन आणि प्रकाश राज यांच्या भूमिका आहेत. चाहत्यांना ज्याप्रमाणे सीरिजचा पहिला भाग आवडला, त्याचप्रमाणे दुसरा भागसुद्धा आवडेल, असे वेबसीरीज निर्मात्याने म्हटले आहे.