Ratnagiri News – संगमेश्वरामध्ये घरात घुसला 8 फुटांचा अजगर, सर्पमित्रांकडून जीवदान

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की कोकणातल्या घरात साप घुसतात. असाच एका घरात साप नव्हे तर चक्क अजगर घुसला होता, तोही आठ फुटांचा. सर्पमित्रांनी वेळीच या घरात धाव घेतली आणि या अजगाराला जीवदान दिले.

रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्याती चिखली बौद्धवाडीत विकास मोहिते यांच्या घरात आठ फुटांचा महाकाय अजगर घुसला होता. या अजगराने सर्वप्रथम एका कोंबडीचा फडशा पाडला. दुसऱ्या कोंबडीकडे त्याचा मोर्चा वळलेला असताना विकास मोहिते यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तातडीने अक्षय मोहिते यांना संपर्क साधला. अक्षय मोहिते व त्यांचे सहकारी सम्यक पवार यांनी अजगराला पकडण्याचे धाडस केले. हा अजगर त्यांनी जंगलात सोडून दिला.