
साहित्य अकादमीचे युवा आणि बालसाहित्य पुरस्कार आज जाहीर झाले. प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या मराठी कादंबरीला युवा पुरस्कार मिळाला. तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ काव्यसंग्रहास बालसाहित्य पुरस्कार प्राप्त झाला. ताम्रपट आणि 50 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिल्लीत साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव काwशिक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीनंतर वर्ष 2025 साठीचे 24 भाषांसाठीचे बालसाहित्य पुरस्कार आणि 23 भाषांसाठीचे युवा पुरस्कार जाहीर झाले. मराठी भाषेतील युवा पुरस्कारासाठी अविनाश कोल्हे, इंद्रजित भालेराव, डॉ. रवींद्र शिंदे परीक्षक होते. बालसाहित्य पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान प्रथम प्रकाशित पुस्तकांचा विचार करण्यात आला. एकनाथ आव्हाड, सोनाली नवांगुळ, लक्ष्मण कडू यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.