
दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला झाशी रेल्वे स्थानकावर 5 ते 6 जणांनी मारहाण केली. या मारहाणीत तो व्यक्ती अक्षरश: रक्तबंबाळ झाला. यावेळी भाजप आमदार राजीव सिंह परिचा देखील त्याच रेल्वेने प्रवास करत होते. भाजप आमदार परिचा आणि त्या प्रवाशामध्ये क्षुल्लक वाद झाला. त्यामुळे आमदाराच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे.
Air India ला अहमदाबादमधील विमान अपघाताचा मोठा फटका, बुकिंगमध्ये 30 ते 35 टक्के घट
राजीव सिंह परिचा हे झाशीच्या बाबिना मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. घटनेच्या दिवशी राजीव सिंह त्यांची पत्नी आणि मुलांसह वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. यावेळी आमदाराला एका प्रवाशाच्या सीटवर बसायचे होते. त्यामुळे त्या व्यक्तीला त्यांच्या सीटवर जाण्यास सांगत होते. प्रवाशाने नकार दिल्यावर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आमदाराने त्यांच्या समर्थकांना याबाबत माहिती दिली.
विमान पाडून टाकेन! Air India च्या विमानात महिला डॉक्टरचा गोंधळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दरम्यान, झांशी रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबल्यावर आमदाराचे 5 ते 6 समर्थक आले आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. या मारहाणीत पीडित गंभीर जखमी झाला आहे. राज प्रकाश असे या पीडित व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आता अशा पद्धतीने प्रवाशांवर आरेरावी करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच नागरिकांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित केले.