
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीशी अमेरिकेचा काहीही संबंध नसल्याचे मोदी सरकार वारंवार सांगत असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांचा हेका कायम आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा तोच दावा केला आहे. ‘हिंदुस्थान-पाकमधील संभाव्य युद्ध मी थांबवलं असलं तरी मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तान ट्रम्प यांची नोबेलसाठी शिफारस करणार
मला नोबेल मिळणार नाही असे ट्रम्प म्हणत असले तरी पाकिस्तान त्यांच्यावर फिदा असल्याचे दिसते. पाकिस्तान सरकार डोनाल्ड ट्रम्प यांची 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अधिकृत शिफारस करणार आहे. भारत-पाकिस्तानमधील अलीकडच्या संघर्षात ट्रम्प यांनी बजावलेली निर्णायक राजनैतिक भूमिका व खंबीर नेतृत्वाचा गौरव म्हणून पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.