
माझी मुले राजकारणात नाहीत, मी आजपर्यंत कधीही स्वतःच्या मुलांसाठी तिकीट मागितले नाही, त्यामुळे पक्षातील अनेकांची अडचण होते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केले. प्रत्येकाने आपल्या मुलांवर प्रेम करावे. मुलांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करावेत. पण कार्यकर्ता हासुद्धा आपल्या परिवाराचा सदस्य आहे असे समजून त्याच्यावर प्रेम करा, असा सल्ला गडकरी यांनी दिला.






























































