हे करून पहा – घरात डासांचा त्रास वाढलाय का?

 कडुलिंबाचा रस – पावसाळ्यात मच्छर, डासांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी घरात कडुलिंबाचा रस ठेवा. कडुलिंबाचा रस पाण्यात मिसळून त्याची घरात फवारणी केल्यास घरातील डासांपासून सुटका मिळवता येऊ शकते. कडुलिंब मिळत नसेल तर लिंबू आणि लवंग घरात उघडय़ावर ठेवल्यास डास घरात येत नाहीत.

 लसून स्प्रे – डास हे लसणाचा वास सहन करू शकत नाहीत. त्यामुळे लसणाच्या चार ते पाच पाकळ्या हलक्या बारीक करून त्याला एका छोटय़ा भांडय़ात मिसळून सोबत उकळा. हे पाणी थंड झाल्यावर घरात स्प्रे केल्यास मच्छर, डासांचा त्रास कमी होतो.