
ओडिशातील पुरी येथे जगप्रसिद्ध जगन्नाथ रथ यात्रा उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहे. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी जगभरातून भाविक येत असतात. भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा यांना तीन वेगवेगळ्या रथांत बसवले जाते. या वर्षी 200 टनांहून अधिक वजनाचे 45 फूट उंच रथ तयार करण्यात आले आहेत. या रथांना 200 हून अधिक कारागिरांनी 58 दिवसांत तयार केले आहे. या तिन्ही रथांत 50 टन लोखंड आणि 300 किलो पितळेचा वापर करण्यात आला आहे. ही यात्रा जगन्नाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू होईल. त्यानंतर डांडा मार्गाहून गुंडिचा मंदिरापर्यंत जाईल. गुंडिचा मंदिरात देवतांचा 7 दिवस मुक्काम राहील.