
अमेरिकेत सरकारी उपकरणांवर व्हॉटस्अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकन संसदेचे कनिष्ठ सभागृह (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज)च्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याने (सीएओ) एक आदेश जारी करून यासंबंधीची माहिती दिली. ‘व्हॉटस्अॅप आता कोणत्याही सरकारी उपकरणावर वापरता येणार नाही. यामध्ये मोबाइल, डेस्कटॉप आणि वेब या तिन्हींचा समावेश आहे. या अधिसूचनेत म्हटले आहे की, जर कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या फोनवर व्हॉटस्अॅप इन्स्टॉल केलेले असेल तर ते ताबडतोब डिलीट करावे. एवढेच नाही तर अज्ञात नंबरवरून येणाऱ्या मेसेजेस किंवा फिशिंग स्पॅमपासून सावध राहण्याचा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.