हे करून पहा! सकाळी लवकर उठायचा प्लान आहे का?

n नियोजन करा ः लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे अशी एक म्हण आहे. सकाळी लवकर उठल्याने चांगले आरोग्य तर मिळतेच, पण त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. त्यामुळे सर्वात आधी झोपेतून लवकर उठण्यासाठी नियोजन करा. रात्री लवकर झोपा आणि सकाळी उठण्यासाठी एक ठोस कारण शोधा.

n मोबाईल, टीव्ही टाळा ः दररोज झोपण्यापूर्वी टीव्ही, मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहा. रात्री हलका आहार घ्या, ज्यामुळे झोप चांगली लागेल आणि सकाळी लवकर उठणे सोपे होईल. अलार्म सेट करा आणि तो तुमच्यापासून थोडय़ा अंतरावर ठेवा.