सुंदर गुलाबी ओठांसाठी ‘हे’ फळ आहे सर्वात उपयुक्त, वाचा

आपल्या चेहऱ्याच्या मेकअपमध्ये ओठांचा मेकअप हा एक महत्त्वाचा मानला जातो. परंतु ओठ गुलाबी लालचुटूक असल्यावर, मेकअपची गरजच नाही. म्हणूनच गुलाबी लालसर ओठांसाठी डाळिंब हे खूप महत्त्वाचे मानले जाते. केवळ ओठांसाठी नाही तर, डाळिंब खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. डाळिंब केवळ आपल्या त्वचेसाठी किंवा ओठांसाठी नाही तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

सौंदर्यासोबतच डाळिंब आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. डाळिंबाचा रस आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी मानला जातो. यामुळे आपल्या त्वचेसाठी तर फायदा होतोच. मुख्य म्हणजे आपल्या आरोग्यामध्येही खूप सारे महत्त्वाचे बदल होतात.

आपल्या ओठांसाठी डाळिंब हे खूप महत्त्वाचे मानले जाते. सर्वांना सुंदर ओठ हवे असतात, परंतु हे सुंदर ओठ नेमके कसे ठेवायचे हेच अनेकांना माहित नसते. ओठ गुलाबी आणि सुंदर ठेवायचे असतील तर, नियमितपणे डाळिंबाच्या रसाचे सेवन करणे उत्तम. डाळिंबाच्या रसात असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी इत्यादींमुळे आपले ओठ सुंदर होण्यास मदत होते.

चेहऱ्याची त्वचा कोमल मुलायम होण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या क्रीम लावतो. या क्रीममुळे आपल्या चेहऱ्यावर अनेक विपरीत परीणाम होत असतात. अशावेळी आपण डाळिंबाचा वापर केल्याने त्वचा कोमल होण्यास मदत होते. कोमल त्वचेसाठी आपण डाळिंबाचा फेस पॅक वापरु शकतो. याकरता डाळिंबाचे दाणे घ्यावे त्याची  पेस्ट बनवा. फेसपॅक करण्यासाठी थोडे दूध आणि मध मिसळा. हे मिश्रण एकजीव करा आणि आपला चेहरा आणि मानेवर लावा. ते 10-15 मिनिटे तसेच ठेवावे आणि कोमट पाण्याने चेहरा धुवावा. आठवड्यातून किमान एकदा हे करायलाच हवे.

Skin Care- तेलकट चेहऱ्यासाठी हे घरगुती फेसपॅक आहेत रामबाण उपाय

डाळिंब पोषक तत्वांनी समृद्ध असून, त्वचेसाठी तसेच आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. डाळिंबामुळे आपल्या रक्ताचा प्रवाह वाढतो  आणि हृदयात ऑक्सिजनची पातळी वाढते. हे आपले सौंदर्य वाढविण्यास मदत करते. डाळिंब त्वचेतून मृत पेशी दूर करतो. तसेच डाळिंब लोहाचा एक चांगला स्त्रोत मानला जातो. डाळिंबाचा उपयोग आपल्या सौंदर्याच्या सोबतीने आपल्या आहारातही करणे खूपच गरजेचे आहे.

डाळिंब आपल्या रक्तवाहिन्या तसेच, त्वचेच्या पेशींसाठी मोठ्या प्रमाणात खनिज पुरवतो. त्याचे पोषक घटक आपल्या हिमोग्लोबिन वाढवते. त्यामुळे त्वचेला चमक येते. डाळिंब देखील पाण्याचा चांगला स्रोत आहे. हे त्वचेला हायड्रेटेड आणि चमक ठेवण्यास मदत करते.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.)