
हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या पतौडी ट्रॉफीचे नाव बदलून ईसीबीने चूकीचे केलेय. तसेच आमच्यासारख्या चाहत्यांना खूश करण्यासाठी त्यांनी पतौडी पदक दिल्याचे सांगत माजी कसोटीपटू फारुख इंजिनीयर यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
ईसीबीने 2007 साली हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यातील मालिकेत पतौडी ट्रॉफी देण्यास प्रारंभ केला होता. आता त्या ट्रॉफीचे अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे नामकरण करण्यात आले आहे. अॅण्डरसन-तेंडुलकर यांचे कर्तृत्व मोठेच आहे, पण जेव्हा या ट्रॉफीला पतौडी यांचे नाव देण्यात आले तेव्हा मला खूप आनंद झाला होता; पण आता माझ्या मित्राचे नाव काढण्यात आलेय. अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफी या नामकरणाबरोबर पतौडी पदकाचीही घोषणा करण्यात आली असती तर समाधान झाले असते.