
गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता पुढील काही दिवसांत पाऊस जोरदार कमबॅक करणार आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवार, शनिवारी व रविवारी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, गुरुवारपासून रविवारीपर्यंत ‘मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा’ इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाने ओढ दिल होती. पण बुधवारी बुधवारी सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत राहिला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कुलाबा वेधशाळेत मंगळवार ते बुधवार सकाळपर्यंत 7 मिमी, तर सांताक्रूझमध्ये 4 मिमी पावसाची नोंद झाली होती.