
बाॅलीवूडमधील बहुतांशी ब्लाॅकबस्टर सिनेमांशी निगडीत काही योगायोगाच्या कथा असतात. अनेक नामांकित कलाकारांनी फारच कमी वयामध्ये सिनेसृष्टीला रामराम केला. यापैकी काहींचे आजारपणामुळे तर काहींचे अकाली निधन झाले. या घटनांमुळे सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अशा घटनामध्ये वाढ झाल्यामुळे, बॉलीवूडला एकप्रकारे ग्रहणच लागलं आहे, असे बोलणे वावगे ठरणार नाही. 36 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातील तीन सुपरस्टार अभिनेत्यांनी असाच जगाचा निरोप घेतला होता.
दिवगंत चित्रपट निर्माते यशराज चोपडा यांचा सुप्रसिद्ध चित्रपट ‘चांदणी’ 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने आणि त्यातील संगिताने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटात विनोद खन्ना, ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या तिन्ही सुपरस्टार अभिनेत्यांनी या जगाचा निरोप घेतला.
कर्करोगामुळे 2017 मध्ये विनोद खन्ना, 2018 मध्ये श्रीदेवी आणि कोरोना काळात 2020 मध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले. तर 2012 मध्ये चित्रपटाचे निर्माते यश चोपडा यांनीही वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या या अभिनेत्यांच्या अशा जाण्याने सर्वांनाच धक्का बसला होता.
‘चांदणी’ या चित्रपटाने ब्लाॅकबस्टर कमाई केली. आजही या चित्रपटाचा चाहतावर्ग तितक्याच आवडीने चित्रपट पुन्हा पुन्हा बघतो. त्यामुळेच कल्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची वर्णी लागली. चांदनीचे बजेट 12.8 कोटी रुपये होते, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 17.2 कोटी रुपये कमावले होते.