
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची छाननी सुरूच असून अपात्र महिलांना त्यातून वगळले जात आहे. आता आणखी 2289 महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात आज ही माहिती दिली. अपात्र ठरलेल्या या महिला सरकारी कर्मचारी असल्याचे तटकरे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या आधी मतांवर डोळा ठेवून सरसकट सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला गेला होता. मात्र, निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकारला त्यांचे आर्थिक ओझे वाटू लागले आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या यादीला चाळणी लावली जात आहे.