
मुंबई – गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्सनजीक रविवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या बॅरिकेट्सच्या कठड्यावर चढला. ट्रक बॅरिकेट्स तोडत 100 मीटरपर्यंत पुढे जाऊन थांबला. ट्रक धडकल्याने बॅरिकेट्सचा चक्काचूर झाला. सुदैवाने चालकाला दुखापत झाली झाली. पहाटेच्या सुमारास झोपेत असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी वाहतूक पोलिसांना धाव घेतली.
































































