Skin Care- कमीत कमी खर्चात मानेवरील काळे डाग होतील झटक्यात दूर, वाचा

मानेवरील काळ्या डागांमुळे आपल्याला चारचौघात वावरताना ओशाळल्यासारखे होते. मानेवरील काळे डाग हे अनेकदा आपल्या सौंदर्यात बाधा आणतात. परंतु आता मात्र मानेवरील काळ्या डागांमुळे तुम्हाला चारचौघात लाजण्याची गरज नाही. तुमच्या खिशाला कात्री न लागता मानेवरील डाग होतील झटक्यात दूर.

मानेवरील काळ्या डागांसाठी काही महत्त्वाचे घरगुती उपाय हे खूप प्रभावी ठरतील.

लिंबू आणि मध
लिंबू आणि मधाच्या वापराने मानेवरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. किमान पंधरा ते वीस मिनिटे लिंबू आणि मधाचे मिश्रण मानेवर लावल्याने, काळे डाग कमी होण्यास मदत होते. हा उपाय आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा न विसरता करावा.

चण्याचे पीठ आणि दही
दोन चमचे चण्याचे पीठ आणि एक चमचा दही यांची जाडसर पेस्ट बनवावी. ही पेस्ट आपल्या मानेवर लावून सुकून द्यावी. सुकल्यानंतर, हलक्या हाताने ही पेस्ट काढावी. आठवड्यातून हा उपाय किमान तीन ते चार वेळा केल्यानंतर, मानेवरील काळे डाग कमी होण्यास मदत होते.

बटाट्याचा रस
बटाट्याचा रस हा त्वचेसाठी खूपच उपयुक्त मानला जातो. मृत त्वचा काढून टाकण्यासाठी बटाटा हा खूप गरजेचा आहे. बटाट्याचा रस काढून हा रस थेट मानेवर लावल्यास याचा खूप फायदा होतो. किमान वीस ते तीस मिनिटे हा रस मानेवर तसाच ठेवून द्यायला हवा. हा उपाय रोज केल्यास, रिझल्ट लगेच पाहायला मिळेल.

तांदळाचे पीठ आणि दूध
तांदळाचे पीठ दोन चमचे घेऊन त्यात थोडेसे दूध मिसळावे. ही पेस्ट आपल्या गळ्यावर लावून किमान पाच ते दहा मिनिटे स्क्रब करावे. आठवड्यातून किमान एक ते दोन वेळा हा उपाय करावा.

कोरफड जेल आणि हळद
कोरफड हे त्वचेसाठी शीतल गुणधर्माचे आहे. तर हळदीमुळे आपल्या त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. एक चमचा कोरफड जेलमध्ये चिमूटभर हळद २० मिनिटे मानेवर लावून ठेवावी. नंतर हे साध्या पाण्याने धुवावे. हे मिश्रण रोज लावल्यास आठवड्याभरात मानेवरील काळे डाग कमी होण्यास मदत होईल.