बाॅलिवूडमधील 8 तास कामासाठी दीपिका पदुकोणला अनुराग बसूचा पाठिंबा, वाचा

बॉलिवूडमधील कामाच्या तासाबद्दल चर्चेमध्ये आता एका नव्या दिग्दर्शकाने उडी घेतली आहे. स्पिरीटमधील कामाच्या वेळेवरुन वाद झाल्यानंतर दीपिका पादुकोणला चित्रपटामधून काढून टाकण्यात आले होते. दीपिकाला संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त आले होते. तिची आठ तास काम करण्याची आणि नफ्यात वाटा देण्याची मागणी नाकारण्यात आली होती. आता, दिग्दर्शक अनुराग बसू यांनी दीपिकाच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. ‘स्पिरिट’ हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात संपूर्ण भारतातील सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहे.

फर्स्टपोस्टशी अलिकडेच झालेल्या संभाषणात अनुराग बसू म्हणाले, “मलाही जास्त वेळ काम करायला आवडत नाही. माझे कलाकार कधीही जास्त वेळ किंवा ताणतणावाबद्दल तक्रार करत नाहीत. म्हणून मी दीपिका पदुकोणशी पूर्णपणे सहमत आहे. मी माझ्या कलाकारांना कधीही त्याबद्दल तक्रार करण्याची संधी देत ​​नाही.”

‘स्पिरिट’ नंतर दीपिका पदुकोणला ‘कल्की 2’ मधूनही काढले, अवास्तव मागण्यांमुळे निर्माते बेजार

चित्रपट निर्मिती प्रक्रियेचे स्पष्टीकरण देताना अनुराग म्हणाला, “मला माझे कलाकार सेटवर खूप आनंदी राहावेत असे वाटते. मी शूटिंग सुरू होण्यापूर्वी त्यांना जास्त माहिती देत ​​नाही. त्यांना त्यांच्या भूमिका समजून घेण्यासाठी मी मदत करतो आणि हीच पद्धत मी पाळत आलो आहे.”

दीपिकाच्या अवास्तव मागण्यांना कंटाळून दीपिकाला डच्चू देण्यात आलेला होता. अनेक तेलुगू वृत्तवाहिन्यांनुसार, संदीप वांगा रेड्डी यांनी दीपिकाला चित्रपटातून काढून टाकले होते. काही मागण्यांवरून संदीप वांगा आणि दीपिका यांच्यात भांडण झाले. दीपिकाच्या अव्यावसायिक मागण्यांमुळे संदीप वांगा रेड्डी नाराज झाला होता.

संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटातून दीपिका पदुकोनला डच्चू, अव्यावसायिक मागण्यांमुळे दिग्दर्शक झालेला त्रस्त

दीपिकाने 8 तास काम करण्याची विनंती केली होती, त्यापैकी 6 तास प्रत्यक्ष शूटिंगचा वेळ आहे. दीपिकाने चित्रपटाच्या नफ्यातील वाट्यासह मोठी फी मागितली तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. असेही म्हटले जात आहे की, दीपिकाने तिचे संवाद तेलुगूमध्ये बोलण्यासही नकार दिला. रिपोर्टनुसार, दीपिकाला स्पिरिटसाठी आतापर्यंतची सर्वाधिक फी मिळणार होती. ती 20 कोटी रुपये फी घेत असल्याचे वृत्त आहे. संदीप रेड्डी वांगा यांना हे आवडले नाही आणि त्यांनी दीपिकाला बाहेर काढले.