
वाढतं वजन हा आता आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपले खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. त्यामुळेच आपले वजनही खूप वाढत आहे. वाढलेले वजन कमी करणं हा खूप जटील प्रश्न आहे. परंतु वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेवल्यानंतर किमान आपण काही काळ झोपू नये.
चयापचय वाढवायचे असेल तर तुम्ही जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी फिरायला जा. रात्रीच्या जेवणानंतर चालून तुम्ही वजन कमी करू शकता. शिवाय जर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर चालणे खूप फायदेशीर आहे कारण यामुळे तुमच्या शरीरातील एंडोर्फिन बाहेर पडून तणाव कमी होतो. हे आपल्याला चांगले वाटण्यासाठी आणि आपला मूड सुधारण्यासाठी कार्य करते. अशा प्रकारे, रात्रीच्या जेवणानंतर चालणे तुम्हाला ताण कमी करण्यास आणि तुम्हाला आनंदी करण्यास मदत करेल.
Benefits Of Walking – दररोज गवतावर चालण्याचे हे 5 आरोग्यवर्धक फायदे
जेवण झाल्यानंतर आपण काही काळ किमान चालायला हवं. हे चालणं जलद गतीने चालणं नसावं तर याकरता शतपावली करणं हे खूप गरजेचं आहे. पूर्वीची जुनी-जाणती माणसं कायम म्हणायची, की शतपावली करा. काय असेल बरं या सर्वांमागचं कारण… जेवणानंतर शतपावली करण्याची प्रथा आता बंद पडल्यातच जमा आहे.
जेवणानंतर चालणे देखील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते कारण ते तुमच्या प्रणालीतील विष बाहेर टाकते. हे आपल्या अंतर्गत अवयवांसाठी चांगले कार्य करते. एक मजबूत प्रतिकारशक्ती फ्लू, सर्दी आणि इतर अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकते.
रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये अंतर राहते. तसेच मुख्य म्हणजे आपली पचनशक्ती सुधारते. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाण्यामुळे आपली पाचन प्रणाली निरोगी राहते. पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्येपासून आराम मिळतो.
अलीकडे आपल्या घरी जाण्या-येण्याच्या वेळाच बदलल्या आणि तिथेचे आपल्या सवयीही बदलल्या. म्हणूनच शतपावली म्हणजे काय असा अनेकांना प्रश्न पडतो. शतपावली म्हणजे जेवणानंतर काही काळ चालणे. त्यालाच शतपावली असे म्हणतात. म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर किमान शतपावली म्हणजे शंभर पावले चालणे हे खूपच गरजेचे आहे.