संजय लीला भन्साळी आणि रणवीर सिंह का झाले एकमेकांपासून दूर? वादाचे नेमके कारण काय, वाचा

संजय लीला भन्साळी आणि रणवीर सिंह यांच्यात एका चित्रपटाच्या वादाने टोकाचे पाऊल गाठले आहे. रणवीर सिंहने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत आता काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार सुभाष के झा यांच्या मते, रणवीरने दिग्दर्शकाच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात मुख्य भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण जेव्हा त्याला दुसरी भूमिका ऑफर करण्यात आली तेव्हा त्याने नकार दिला. नंतर ती भूमिका विकी कौशलला ऑफर करण्यात आली. आता या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, आलिया भट आणि विकी कौशल असे तिघे दिसणार आहेत.

असेही म्हटले जात आहे की रणबीरने अलीकडेच त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला पण दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना आमंत्रित केले नाही. रणवीरने दिग्दर्शकासोबत त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट दिले आहेत. पण आता या नात्यात दुरावा आल्याच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.

रणवीर सिंगने संजय लीला भन्साळींसाठी रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र हाती आलेल्या बातमीनुसार आता भन्साळी आणि रणवीर सिंग एकमेकांपासून अंतर राखत आहेत. यामागील कारण लव्ह अँड वॉर हा चित्रपट कारणीभूत आहे असे म्हटले जात आहे. रणबीर कपूर-विकी कौशल आणि आलिया भट्ट यांच्या लव्ह अँड वॉरमुळे या जोडीमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.

रणवीर सिंगने त्याचा 40 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता. यावेळी त्याने फक्त त्याच्या वैयक्तिक मित्रांनाच आमंत्रित केले होते. रणवीरचे खास मित्र असलेले संजय लीला भन्साळी पार्टीमध्ये नव्हते. त्यानंतर दोघांमधील मतभेदाच्या बातम्या आणखीनच पक्क्या झाल्या. आता संजय लीला भन्साळी त्यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटावर काम करत आहेत आणि दुसरीकडे रणवीर सिंग ‘धुरंधर’ चित्रपटात काम करण्यात व्यस्त आहे.