‘हिंदीची सक्ती हवीच कशाला?’ उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीसांना दिले पुस्तक भेट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधानभवनमध्ये भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी ‘हिंदीची सक्ती हवीच कशाला?’ हे पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना भेट दिले. राज्यभरातील विविध संपादकांनी हिंदीसक्तीविरोधात लिहिलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकात आहे.

यावेळी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विधानसभा गटनेते भास्कर जाधव, शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू, उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना प्रवक्ते हर्षल प्रधान, आमदार सुनिल राऊत, आमदार जगन्नाथ अभ्यंकर, आमदार महेश सावंत, आमदार बाळा नर, आमदार संजय देरकर उपस्थित होते.

निर्लज्ज… नमक हराम… एहसान फरामोश…! आदित्य ठाकरे यांचा पारा चढला; भ्रष्टनाथ मिंधेंची सालटी काढली