
गेल्या काही दिवसांमध्ये महायुती सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांचे अनेक प्रताप समोर आले आहेत. यावरूनच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष असलेल्या मिंधे गट आणि अजित पवार गटाकडे मंत्र्यांच्या वर्तनासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, असं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.
‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या संदर्भात आलेल्या तक्रारींवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत फडणवीस म्हणाले आहेत की, “कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल”, असं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं.
या वृत्तानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे आपली भावना व्यक्त करत मंत्र्यांच्या वर्तनावर तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.