असं झालं तर…; प्रवासात रेल्वे पास हरवला तर

1 मुंबई लोकलच्या गर्दीमधून प्रवास करताना अनेकदा रेल्वे पास चोरीला जातो किंवा हरवतो.

2 जर प्रवासावेळी रेल्वे लोकलचा पास चोरीला गेल्यास काय करावे अनेक प्रवाशांना सूचत नाही.

3 असं झालं तर सर्वात आधी पास चोरीला गेल्याची किंवा हरवल्याची माहिती स्टेशन मास्तरांना द्या.

4 पास हरवल्यानंतर नवीन पास काढून देण्याची कोणतीही तरतूद रेल्वेच्या नियमांमध्ये नाही.

5 त्यामुळे पास हरवल्यास तत्काळ दुसरा पास काढा अन्यथा विनातिकीट म्हणून दंड भरावा लागेल.