अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळले 

हवाई दलाच्या तळानजिक लेमूर येथे एफ-35 हे लढाऊ विमान कोसळले. विमान कोसळताच वैमानिकाने सुटका करून घेतली आणि तो तात्काळ विमानाच्या बाहेर पडल्याने बचावला. नेमके काय घडले याबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी लढाऊ विमानाची निर्मिती करणारे संरक्षण पंत्राटदार लॉकहीड मार्टिन यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.