महादेव मुंडेंना न्याय दिल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, अंबादास दानवे यांचे ज्ञानेश्वरी मुंडे यांना आश्वासन

परळीत वाल्मीक कराड गँगने निर्घृण हत्या केलेल्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले.

महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज विरोधी पक्षनेते दानवे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या दबावामुळे 21 महिने उलटल्यानंतरही पोलीस आपल्या पतीच्या हत्या प्रकरणाचा तपास करत नसल्याचे त्या म्हणाल्या. त्यावर याप्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी सरकारला भाग पाडू, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना आश्वस्त केले.