
‘जगात सध्या आर्थिक अस्थिरता आहे. अशा वातावरणात आपण सावध व एकजूट राहायला हवे. स्वदेशीचा संकल्प करून देशात बनवलेल्या वस्तूंनाच प्राधान्य द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेल्या 25 टक्क्यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे हिंदुस्थान सरकार सावध झाले आहे. त्याचे प्रतिबिंब आज मोदींच्या भाषणात पडले. मोदी म्हणाले, ‘जगातील बहुतेक देश स्वतःच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत आहेत. हिंदुस्थान जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, अशा वेळी आपल्यालाही सजग राहिले पाहिजे. हिंदुस्थानींच्या कष्टातून बनलेल्या वस्तू खरेदीकडे आपला कल असला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.