
सीईटीपी प्लांट आम्ही उभारू, पण शासनाने आम्हाला थोडी मदत करावी. माझं काम पोलिसासारखे शिट्टी वाजवण्याचे आहे. माझ्या खात्याकडे बजेट नाही. माझ्या खात्याला बजेट म्हणजे उद्योगांच्या चुका. त्यांना फाईन लावल्यावर आम्हाला बजेट मिळते, अशा शब्दात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी खदखद व्यक्त केली.
उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नाशिकमध्ये पार पडली. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही. सीएसआर फंडातून जसे मंदिर, शिक्षणासाठी पैसे उभे करतात, तसा तुम्ही पर्यावरणासाठी निधी उभा करा. ईडी वैगेरे कशा धाडी टाकतात, तशा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एसटीपी प्लांटवर धाडी टाकाव्यात. प्रक्रिया न करता थेट नदीत पाणी सोडलं जातं का हे प्रत्यक्ष पाहा, अशा सूचना पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.