
हिमालयाच्या कुशीत 2005 मीटर उंचीवर असलेले मसुरी अनेकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. मसुरीत जायचे असेल तर सरकारी पोर्टलवर पर्यटकांना नोंदणी करावी लागेल. मसुरीतील हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि होमस्टेच्या मालकांना आता पर्यटकांची नोंदणी उत्तराखंड पर्यटन विभागाच्या एका इंटरनेट पोर्टलवर करावी लागेल. या मागील कारण म्हणजे या भागाच्या नाजूक परिसंस्थेला (इकॉलॉजी) नुकसान पोहोचू नये आणि वहन क्षमता मर्यादेपलीकडे जाऊ नये म्हणून. हा आदेश नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने (एनजीटी) नेमलेल्या समितीने 2023 च्या अहवालात केलेल्या 19 प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपायांचा एक भाग म्हणून लागू करण्यात आला आहे.