
रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची आज 17 हजार कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. अनिल अंबानी सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात पोहोचले. रात्री 9 वाजेपर्यंत ईडीने त्यांची चौकशी केली.
ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत अनिल अंबानी यांना जवळपास डझनभर प्रश्न विचारले आणि त्यांचा जबाब नोंदवला. पंपनीत पुठल्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचे ते म्हणाले. तसेच पंपन्यांचे अधिकारी ईडीला तपासात सर्व प्रकारचे सहकार्य करत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, ईडी पुढच्या 7 ते 10 दिवसांच्या आत अंबानी यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.