डोळे सारखे चुरचुरतात? ‘हे’ करून पहा

सतत स्क्रीनसमोर बसणे, प्रदूषण वा अपुरी झोप या कारणांमुळे डोळे चुरचुरण्याचा, जळजळण्याचा त्रास अनेकदा होतो. काही साध्या उपायांनी यावर मात करता येऊ शकते.

डोळे स्वच्छ पाण्याने धुवत चला. त्यामुळे डोळय़ांना आराम मिळतो. डोळय़ांना सतत हात लावणं किंवा विनाकारण ते चोळणं आधी बंद करा. अधूनमधून डॉक्टरांकडून डोळे तपासून घेत चला. जेणेकरून काही त्रास असेल तर तो वेळीच कळेल व उपचार करता येतील.

कडक उन्हात बाहेर जाताना टोपी किंवा गॉगल घालायला विसरू नका. धुळीच्या ठिकाणी जातानाही गॉगल वापरा. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. जळजळ थांबत नसेल तर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आयड्रॉप्स घ्या.