जम्मू कश्मीरमध्ये रस्ते अपघातात दोन पोलिस अधिकारी ठार, एक जखमी

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी 10 आॅग्सटला एक रस्ता अपघात झाला. या अपघातामध्ये जम्मू कश्मीरमधील 2 पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेचे काम आटोपल्यानंतर श्रीनगरहून जम्मूला जाणाऱ्या तीन उपनिरीक्षकांना (एसआय) शहरातील लासजन परिसरातील तेंगन येथे अपघात झाला.

माहिती मिळताच स्थानिक लोकही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमी पोलिस अधिकाऱ्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे दोघांना मृत घोषित करण्यात आले. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. ज्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती देताना दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दोन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हा अपघात तेंगण येथे झाला. हे तिन्ही पोलिस अधिकारी अमरनाथ यात्रा ड्युटीनंतर श्रीनगरहून जम्मूला जात होते.

मृत पोलिस अधिकाऱ्यांची ओळख सचिन वर्मा आणि शुभम अशी झाली आहे. जखमी अधिकाऱ्याची ओळख मस्तान सिंग अशी झाली आहे. सध्या मस्तान सिंग रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दोन्ही मृत अधिकाऱ्यांवर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.