
महाकाय अजगराला कचऱ्याच्या डब्यातून रेस्क्यू करतानाचा एका तरुणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लॉस एंजेलिसच्या डाऊनटाऊनमधील द पियरोट अपार्टमेंटमधील पार्किंग गॅरेजचा हा व्हिडीओ आहे. तिथे एका मोठय़ा कचऱयाच्या डब्यात 20 फूट लांबीचा अजगर रेंगाळताना दिसला. अजगर पाहून लोक घाबरले. सर्पमित्र जोसेफ हार्ट याला बोलावण्यात आले. जोसेफ अत्यंत सावधगिरीने तो अजगराला बाहेर काढतो. अजगराला नियंत्रित करण्यासाठी जोसेफ आधी त्याचे तोंड पकडतो आणि त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतो. नंतर अजगराचे तोंड सोडून देतो. त्याला आपल्या अंगावर ओढून घ्यायचा प्रयत्न करतो. अजगर पायापासून त्याच्या पूर्ण शरारीला विळखा घालतो तरीही सर्पमित्र शांतपणे त्याला हाताळताना दिसतोय. @ reptile.hunter नावाच्या इन्स्टा अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.