लोकसभेत चर्चेविना आयकर विधेयक मंजूर

बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी गदारोळ केला. या गोंधळातच नवीन आयकर विधेयक 2025 आणि कर कायदा सुधारणा विधेयक -2025 तसेच कर कायदा सुधारणा विधेयक-2025 मंजूर करण्यात आले. तसेच काही विधेयकेही सादर करण्यात आली. चर्चेविना सरकारने विधेयके मंजूर आणि सादर करण्याचा लावलेला सपाटा म्हणजे लोकशाहीचा विश्वासघात आहे, अशी टीका करत सरकारने याप्रकरणी उत्तर द्यावे, अशी मागणी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लावून धरली.