
यंदाचा स्वातंत्र्यदिन जिओहॉटस्टार धमाल, थरार आणि देशभक्तीच्या रंगात रंगणार आहे. ‘ऑपरेशन तिरंगा’ या खास लाइनअपसह जिओहॉटस्टार प्रेक्षकांसाठी स्क्रीनवर मनोरंजनाचा तडका घेऊन येत आहे. गुप्तचरांच्या चित्तथरारक गोष्टींपासून ते हृदयाला भिडणाऱ्या देशभक्तीच्या कथांपर्यंत कोणते आहे हे खास खास चित्रपट आणि वेब सिरीज, चला जाणून घेऊ…
सरजमीन
दिग्दर्शक संतोष सिवन यांची ‘सरजमीन’ ही कथा खऱ्या देशभक्ताची आहे. काजोल, इब्राहिम अली खान, पृथ्वीराज सुकुमारन व मिहिर आहुजा अभिनीत ‘सरजमीन’ हा चित्रपट देशासाठी झटणाऱ्या सामान्य माणसांची ही भावनिक कहाणी आहे, जी तुमच्या मनाला स्पर्श करेल.
सलाकार
फारूक कबीरच्या ‘सलाकार’मध्ये मौनी रॉय एका धमाकेदार नव्या अवतारात दिसणार आहे. खऱ्या घटनांवर आधारित ही हिंदुस्थानी गुप्तहेराची कथा आहे. जी गुप्त मोहिमा, विश्वासघात आणि राष्ट्रीय रहस्ये तुम्हाला खिळवून ठेवेल, ही अशी कहाणी आहे.
स्पेशल ऑप्स 2.0
के. के. मेननचा हिम्मत सिंग पुन्हा एकदा ‘स्पेशल ऑप्स 2.0’मध्ये धमाल उडवायला सज्ज आहे. यावेळी मोठी आव्हाने, गूढ शत्रू आणि भावनिक ट्विस्ट यांच्यासह हा गुप्तचर ड्रामा आणखी धारदार झालाय. कठीण मिशन्स आणि जागतिक दडपणाखाली हिम्मत सिंग कसा सामना करतो, हे या सिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.