
पाकिस्तानवर वाकडी नजर करण्याचा विचारही करू नका. आता आमच्यावर हल्ला झाल्यास गुजरातेतील जामनगर येथे असलेली रिलायन्सची जगातील सर्वात मोठी रिफायनरी नेस्तनाबूत करू, असे स्वप्नरंजन पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी केले आहे.
असीम मुनीर सध्या अमेरिकेत आहेत. फ्लोरिडातील टाम्पा येथे पाकिस्तानी नागरिकांसाठी आयोजित जेवणावळीत बोलताना असीम मुनीर यांनी मोठमोठ्या गप्पा मारल्या. हिंदुस्थानला अणुहल्ल्याची धमकीही त्यांनी दिली. आता आमच्यावर हल्ला झाल्यास गुजरातेतील मुकेश अंबानी यांच्या मालकीची जगातील सर्वात मोठी रिलायन्स रिफायनरी उडवण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, अशी दर्पोक्ती त्यांनी केली.