
फुगलेली चपाती खायला अनेकांना आवडते. जर चपाती फुगवायची असेल तर सर्वात आधी पिठात थोडेसे मीठ आणि गरम पाणी घेऊन पीठ मळून घ्या. पिठाला पंधरा ते वीस मिनिटे भिजवून ठेवा. चपाती लाटताना ती पातळ आणि गोल लाटा. तवा गरम झाल्यावर त्यावर चपाती टाका. चपाती दोन्ही बाजूंनी चांगली शेका.
चपाती लाटताना अतिसुक्या पिठाचा वापर करू नका. कारण तुम्ही जास्त पीठ वापरले तर ते पीठ चपाती भाजताना जळते. चपाती तव्यावर शेकत असताना त्यावर तूप किंवा तेल लावा. उन्हाळ्यात पीठ मळताना बर्फाचे पाणी पीठ मळताना वापरल्यास चपाती मऊ होते. पिठात तोडे तेल घालून पीठ मळल्यास चपाती मऊ होते.