
उंचच्या उंच मनोऱ्यांचा थरार आणि बालगोपाळ गोविंदांचा उत्साह आज महाराष्ट्रभर दिसतोय!‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत एकजुटीने खेळल्या जाणाऱ्या दहीहंडीच्या या खेळाचा आनंद घेण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे मराठामोळ्या उत्साहात सहभागी झाले. वरळी, प्रभादेवी, डोबिंवली, करी रोड येथील दहीहंडी उत्सवात उपस्थिती लावली.