मुंबईत पाणी का तुंबले? आदित्य ठाकरे यांचा सवाल

गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिका ही निवडून आलेल्या प्रतिनिधींशिवाय थेट सरकारच्या ताब्यात आहे. मात्र निवडणुका नसल्याने जबाबदारी स्वीकारण्यास कुणीही नाही. त्यामुळे मुंबईतील पावसात मुंबईकरांची गैरसोय झाल्यामुळे पालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या, किती नव्या ठिकाणी आणि का पाणी तुंबले, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या उपाययोजनांबाबत ‘एक्स’वर प्रश्न उपस्थित केले आहेत. मे महिन्यात झालेल्या दहा मिनिटांच्या पावसाने अंधेरी सबवे बंद झाला, तर सीप्झ पाण्याखाली गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शिवाय अशा वेळी अतिरिक्त आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.

 

फेकनाथ मिंधे यांच्या रस्ते घोटाळय़ामुळे मुंबईच्या रस्त्यांची आता दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की, केवळ पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन फक्त भेटीचे पह्टो टाकण्यात वेळ न घालवता, मुंबईकरांना खऱया प्रश्नांची उत्तरे द्या.