
मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्थानीय लोकाधिकार समिती सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला. प्रस्थापित अपना पॅनलचा धुव्वा उडवत स्थानीय लोकाधिकार समिती सहकार पॅनलने 15पैकी तब्बल 11 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले.
मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी सहकारी पतपेढी या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 11 ऑगस्ट रोजी पार पडली. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव – खासदार अनिल देसाई. सरचिटणीस प्रदीप मयेकर, डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष एस.के. शेटे, सेव्रेटरी सुधाकर अपराज, एससी एसटी अँड ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश कांबळे, कार्याध्यक्ष गिरीश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकूटकर यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या या चुरशीच्या निवडणुकीत स्थानीय लोकाधिकार समिती सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला.
विजयी उमेदवारांचे स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकूटकर, डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेव्रेटरी सुधाकर अपराज, सेव्रेटरी दत्ता खेसे, एससी एसटी अँड ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष गिरीश कांबळे, मुंबई बंदरचे कामगार बोर्ड सदस्य प्रदीप नलावडे यांनी अभिनंदन केले.
विजयी उमेदवार
निवडणुकीत स्थानीय लोकाधिकार समिती सहकार पॅनलच्या सर्वसाधारण गटात संदीप चेरफळे, अनंत (अप्पा) भोसले, अजित झाझम, राकेश भाटकर, मनीष पाटील, संदीप गावडे, मिलिंद रावराणे, महिला राखीव गटात सुजाता दळवी, इतर मागासवर्गीय गटात प्रशांत वारेकर, अनुसूचित जाती/ जमाती गटात राजेश जाधव, भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात नामदेव सरगर असे एकूण 11 उमेदवार विजयी झाले.