
वाढते वजन ही सध्याच्या घडीला अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. वाढत्या वजनामुळे आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे न्यूनगंडही बळावतो. वाढते वजन कमी करण्यासाठी आपण नानाविध उपाय करतो. परंतु यामध्येही अपयश येते. अशावेळी काही घरगुती उपाय केल्याने, आणि पूरक आहार घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
Health Tips – अंगकाठी खूपच बारीक असेल तर, आहारात हे पदार्थ समाविष्ट करा आणि निरोगी राहा
आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक पदार्थांचा आहारात समावेश करतो. परंतु दही भात हा एक असा पदार्थ आहे याला पाहून अनेकजण नाक मुरडतात. परंतु हाच दही भात दक्षिण भारतीयांची पहिली पसंती आहे. दही भात पचायला हलका असल्याने, त्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा भरपूर आहेत.
दह्यासोबत भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळेच सध्याच्या घडीला अनेकांनी आहारात दही भाताचा समावेश केलेला आहे. दही आणि भात खाल्ल्याने वजन कमी होते आणि हाडेही मजबूत होतात. दही आणि भात खाण्याचे आणखी अनेक फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
Women’s Health – महिलांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे का गरजेचे आहे?
दही भात का खायला हवा?
वजन कमी करणाऱ्यांसाठी दही भात हा एक उत्तम पर्याय मानला गेला आहे. परंतु याजोडीला आवश्यक व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे. दही भाताचा आहारात समावेश केल्यामुळे भूक कमी लागते. यामुळेच वजन कमी होण्यासही खूप मदत होते.
दही-भात शरीराचे तापमान कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. दही भातामुळे पोटाला आतून थंडावा प्राप्त होतो तसेच कॅल्शियम व्यतिरिक्त, दह्यामध्ये प्रथिने देखील जास्त प्रमाणात असतात.
दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते, जे तुमच्या हाडे आणि दातांसाठी खूप महत्वाचे आहे. दही भात खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत आणि निरोगी होण्यास मदत होते.
Health Tips – रात्रभर दुधात भिजवलेले मखाना खाण्याचे खूप सारे फायदे, वाचा
पचनाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी दही भात हा एक उत्तम पर्याय आहे. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि आतड्यात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाची रचना सुधारतात. याशिवाय, दही आणि भात खाल्ल्याने मासिक पाळीपूर्वी होणारी पोटदुखी मोठ्या प्रमाणात कमी होते.
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात आणि शरीराला रोगांशी लढण्यास सक्षम करतात. म्हणूनच आहारामध्ये भात आणि दही जितके जास्त समाविष्ट कराल तितके जास्त शारीरिक फायदे मिळतात.
आहारतज्ज्ञांच्या मते दही हे ताण कमी करणारे आहे. दह्यामध्ये आढळणारे प्रोबायोटिक बॅक्टेरिया तणाव कमी करण्यास मदत करतात.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)