Health Tips – मधुमेहींसाठी ‘हे’ पदार्थ संजीवनीपेक्षा कमी नाहीत, वाचा

एकदा का मधुमेह जडला की, रुग्णाला त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळांची खूप काळजी घ्यावी लागते. मधुमेहींना केवळ आहाराच्या वेळा पाळण्याची गरज नसते तर, आहारात काय खावे याबद्दल सुद्धा जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.

मधुमेहींनी आहारात काय खावे काय नको हे जाणून घेणे हे खूप गरजेचे आहे. खाण्याच्या सवयी योग्य नसतील तर रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढू लागते. कधीकधी, रक्तातील साखरेची पातळी खूपच कमी होते. म्हणूनच काय खाल्लं जातंय आणि काय खाल्लं पाहिजे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा मधुमेहाच्या रुग्णांना गोड पदार्थांची खूप इच्छा असते आणि ते गोड पदार्थ खातात ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर अचानक वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे पदार्थ खूप फायदेशीर ठरतात.

 

मधुमेही रुग्णांनी आहारात हे अन्नपदार्थ खाणे गरजेचे

सुक्या मेव्यांपैकी बदाम, काजू आणि पिस्ता हे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर ठरतात. हे खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते. सुका मेवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता.

हिरव्या पालेभाज्यांमध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात. या पानांमध्ये कॅल्शियम आणि लोह देखील असते आणि ते मॅग्नेशियमचा देखील चांगला स्रोत आहेत. टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी मॅग्नेशियम प्रभावी आहे. अशा परिस्थितीत आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

काकडी- मधुमेहाच्या रुग्णांसाठीही काकडी खूप चांगली आहे. त्यात फक्त 96 टक्के पाणी असते. ते केवळ रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करत नाही तर त्वचेला हायड्रेट ठेवते आणि त्वचेवर चमक राखते.

Health Tips – दुधात ‘ही’ पावडर घाला, फायदे जाणून थक्क व्हाल वाचा

कारले- साखर संतुलित करण्यासाठी काहीतरी कडू खाणे हे मधुमेहींसाठी केव्हाही उत्तम. मधुमेहाच्या रुग्णांनी आठवड्यातून ३ वेळा कारल्याचे सेवन करावे जेणेकरून रक्तातील साखर सामान्य राहील.

शेवग्याची शेंग- मधुमेहींसाठी शेवग्याची शेंग ही सर्वात उत्तम मानली जाते. यामुळे मधुमेह व्यवस्थापनात हे खूप फायदेशीर मानले जातात.

Health Tips – स्मरणशक्ती वाढण्यासाठी अक्रोड सर्वात उत्तम पर्याय, जाणून घ्या अक्रोड खाण्याचे फायदे

मधुमेहाचे रुग्ण आहारात बेरीचा समावेश करू शकतात. बेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि त्यात फायबर देखील चांगले असते. रक्तातील साखर आणि जळजळ कमी करण्यासाठी बेरी खाणे खूप फायदेशीर ठरते.

मधुमेहात ओट्स हे खाण्यासाठी चांगले धान्य आहे. त्यात फोलेट, क्रोमियम, बी जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असते. शिवाय, त्यात विरघळणारे फायबर भरपूर असते आणि ते रक्तातील साखर कमी करते.

ब्रोकोली, फरसबी आणि मशरूम हे स्टार्च नसलेले पदार्थ आहेत. मधुमेहाचे रुग्णही हे खाऊ शकतात. हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहण्यावर परिणाम होतो.