
पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना व मंत्र्यांना अटक करण्याबाबतचे एक विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहां यांनी सादर केले. या विधेयकावरून लोकसभेत मोठा गोंधळ उडाला. सत्ताधारी या कायद्याचा वापर करून विरोधकांची ज्या राज्यात सत्ता आहे तिथल्या मंत्र्यांना अटक करण्यासाठी करेल असा आरोप विरोधकांनी केला आहे.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना अटक करण्याबाबतचे एक विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत सादर केले. या विधेयकावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विधेयकाला विरोध करत विरोधी पक्षातील खासदारांनी विधेयकाची प्रत फाडून अमित शहांसमोर फेकली. pic.twitter.com/WSyL9EKoxL
— Saamana Online (@SaamanaOnline) August 20, 2025
या विधेयकावरून लोकसभेत गोंधळ सुरू असतानाच तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी व इतर खासदारांनी या विधेयकाची प्रत फाडून थेट गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेने भिरकावली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या विधेयकावरून लोकसभेत काँग्रेसचे खासदार के वेणूगोपाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना फटकारले आहे. ”हे विधेयक संविधानाच्या मूलभूत तत्वांचे उल्लंघन करत आहे. अमित शहा जेव्हा गुजरातचे गृहमंत्री होते. तेव्हा त्यांना अटक झाली होती. तेव्हा त्यांनी पद सोडण्याची नैतिकता दाखवली होती का? असे वेणूगोपाल यांनी म्हटले आहे.