निवड समितीला लाभणार नवे क्रिकेटपटू

बीसीसीआयने निवड समिती सदस्यांच्या काही रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. राष्ट्रीय निवड समितीच्या पदाव्यतिरिक्त, महिला आणि कनिष्ठ निवड समितीच्या पदांसाठी नव्या सदस्यांना स्थान दिले जाणार आहे. त्यामुळे लवकरच अजित आगरकरांच्या समितीला नवे सहकारी लाभतील. बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून वरिष्ठ पुरुष संघासाठी दोन, महिला संघासाठी चार आणि कनिष्ठ संघासाठी एक अशा निवड समिती सदस्यपदांसाठी इच्छुक माजी क्रिकेटपटूंना अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्य पदासाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.