कबुतरांचा परिणाम तपासण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन

कबुतरांमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने तज्ञांची समिती स्थापन केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा, पुणे येथील संचालक विजय कांदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचे नगररचना विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे हे सदस्य सचिव आहेत. या समितीत सदस्य म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे, प्राध्यापक व विभागप्रमुख, कम्युनिटी मेडिसीन एम्स नागपूरचे डॉ. प्रदीप देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, प्राणी कल्याण मंडळाचे सचिव एस.के. दत्ता, फुप्फुस तज्ञ  सुजित  रंजन,  डॉ. अमिता आठवले, आयसीएमआर, रोगप्रतिकारशक्ती तज्ञ, डॉ. मनीषा मडकईकर, पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. आर.जे. झेंडे,  ग्रँट मेडिकल कॉलेजच्या सूक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. शिल्पा पाटील, आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांचा समावेश आहे.