गोविंदाचा संसार मोडला!

अभिनेता गोविंदा सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा हिने घटस्फोटासाठी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे. गोविंदावर इतर महिलांशी संबंध आणि क्रूरतेचा आरोप करत सुनीता हिने घटस्फोटाची मागणी केली आहे. कुटुंब न्यायालयाने 25 मे रोजी गोविंदाला समन्स बजावले होते. दरम्यान, गोविंदाच्या जवळच्या मित्रांनी मात्र घटस्फोटाच्या वृत्ताचे खंडन करत या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.