Ahilyanagar News – पिठोरी शनी अमावस्यानिमित्त तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात भव्य यात्रा, भाविकांची तुडूंब गर्दी

श्रावणातील शेवटचा शनीवार आणि पिठोरी शनी अमावस्यानिमित्त तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात भव्य यात्रा भरली. शनी महाराजांच्या जय घोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. यावेळी दर्शनासाठी मंदिरात रांगा लागल्या होत्या. राज्यासह परराज्यातून तसेच विदेशातून आलेल्या भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर वाहनतळ उभारल्याने भाविकांना पायी दर्शन घ्यावे लागले. दुपारपर्यंत तीन लाख भाविकांनी शनी दर्शनाचा लाभ घेतला.

शुक्रवारी (22 ऑगस्ट 2025) श्रावणी बैलपोळा सण पिठोरी अमावस्यास दुपारी प्रारंभ झाला. अर्धी शनी असल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री शनी महाराजांची महाआरती करून यात्रेस प्रारंभ करण्यात आला. पहाटे पासून मंदिराकडे भाविकांचे ओघ सुरू झाल्याने प्रचंड भाविक शनी मंदिरात दाखल झाले. दुपारच्या मध्यान महआरती सोहळ्याने गर्दीत वाढ झाली. मध्यान आरती सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. ‘बोलो शनी महाराज की जय’ या शनीदेवाचा जयघोषाने परिसर दुमदूमून गेला. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे शनीच्या चौथरा दर्शन शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच बंद करण्यात आले होते.

शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचे भक्त राकेश कुमार तसेच झिम्बाब्वे येथील शनिभक्त जयेश शहा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शिवाय पहाटे मुख्य आरती सोहळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते संपन्न झाला. आज मध्यान मुख्य आरती अमेरिका संदीप माटा यांच्या हस्ते संपन्न झाला. दुपारनंतर शनिशिंगणापूर कडे गर्दीचा ओघ वाढल्याने शनिशिंगणापूरच्या चारीही बाजूचे रस्ते फुलून गेले. शनी अमावस्या पर्वकाळ असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी झाली. अर्धी अमावस्या असताना श्रावणाचा शेवटचा पाचवा शनिवार हा योग आल्याने लाखो. भाविकांनी दर्शनाचा लाभ यावेळी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर चिटणीस आप्पा शेटे सर विश्वस्तप्राध्यापक शिवाजीराव दरंदले यात्रेवर लक्ष ठेवून होते. पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शनी अमावस्यानिमित्त शनिशिंगणापूर आज भव्य यात्रा भरली शुक्रवार दिनांक 22 रोजी च्या मध्यरात्रीपासून यात्रेस प्रारंभ झाला मध्यरात्री, पहाटे, मध्यान दुपारी आणि सायंकाळी सात वाजता महापूजा चार महापूजा संपन्न झाले. या महापूजासाठी उद्योगपती विविध मान्यवरांनी महाआरती बुक केल्याने 21 हजार रुपये पेड महापूजा करण्याची पर्वणी अनेक उद्योगपतींनी साधली – नवनाथ कुसळकर सोनई.